आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था शाखा माळकौठा ता. मुदखेड येथे बोर्डाचे अनावरण तालुकास्तरीय पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण सोहळा संपन्न

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.6
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र शाखा माळकौठा ता. मुदखेड येथे बोर्डाचे अनावरण व तालुक्यातील अनेक शाखा, कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात, नामघोषात बोर्डाचे ऊदघाटन संस्थापक अध्यक्ष हभप गुरूवर्य राम महाराज पांगरेकर ,अनेक प्रमुख मान्यवर संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, दतराम पा.यडके, संस्थेचे सहसचिव प्रभाकर पुय्यड,सचिव व्यंकटराव जाधव माळकौठेकर, रामजी पा.शिदे माळकौठेकर , जिल्हाप्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल श्री धोडीबा गाढे, श्री व्यकटराव येळेगावकर, दतराम पाटील, कुसुमताई शिंदे,ञिमुख यडके श्री भगवान पा. रहाटीकर, बालाजी पवार, सोपान गिरे, शिवाजीराव पांगरगेकर,इत्यादी मान्यवरांच्या गावकऱ्यांच्या, परिसरातील भाविक भक्ताच्या ऊपस्थित बोर्डाचे अनावरन, संपन्न झाले.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते संतांच्या प्रतिमेत पुष्पहार घालून वंदन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सुत्रसंचलन व्यंकटराव पा.जाधव माळकौठेकर यांनी केले.
मुदखेड तालुक्यातील सर्व गाव शाखा व कार्यकत्यां पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळ्यात नियुक्ती पत्र देऊन त्यांचा मानसन्मान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकर यांनी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे उद्देश
धर्माचे रक्षण,संतांचे वाड्यम घरोघरी गेले पाहिजे धार्मिक भावना वाढली पाहिजे सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी म्हणुन घर तिथे ज्ञानेश्वरी जावी म्हणुन गत सहावर्षापासुन घरोघरी मोफत ग्रंथ देऊन ज्ञानेश्वरी पारायण आपल्या सर्वांच्या सहकार्याने यावर्षी जेवढ्या ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत तेवढे ग्रंथ पारायण करण्याचा संकल्प,आपल्या हक्काची पंढरपुर येथे धर्मशाळा स्थापन करण्यासाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जि.प्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल, शिवाजीराव पांगरेकर, व्यंकटराव जाधव माळकौठेकर, प्रभाकर पा.पुय्यड इत्यादी चे मार्गदर्शन झाले.
हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठी मुदखेड ता.अध्यक्ष बालाजी पा.शिंदे माळकौठेकर ,धोंडीबा पाटील दरेगावकर,बालाजी पाटील पारडीकर,सूर्यकांत पा.माळकौठेकर , वसंत पा. शिंदे दरेगावकर , भास्कर पा. जाधव, गावकऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वि केला.
हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठि आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे माळकौठा,शाखा अध्यक्ष आनंदा शिदे, राजु जाधव, गोविद ऊबाळे,मारोती जाधव,प्रकाश सर्व पदाधिकारी ईत्यादिने केले आहे.मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पदाधिकारी सहभागी वझाले होते असे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.