क्षितिज गाडेकर या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत च्या वतीने केला सत्कार.

जालना/प्रतिनिधी, दि.11
नवोदय विद्यालयात निवड
झालेल्या क्षितिज जितेंद्र गाडेकर यास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ शिंदखेड यांच्यातर्फे सत्कार करण्यात व निरोप देण्यात आला.
वाघरूळ जहागीर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ सिंदखेड येथील गुणवंत विद्यार्थी क्षितिज जितेंद्र गाडेकर याची नवोदय विद्यालयात आंबा परतुर येथे निवड झाली या निमित्ताने सदरील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन् समितीचे अध्यक्ष गावचे लाडके सरपंच सुधाकर खरात हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सखाराम खरात रवींद्र गाडेकर , राहुल गाडेकर , राजाराम वाघमारे , विमलताई गाडेकर, छाया गाडेकर हे उपस्थित होते.
सत्कारमूर्ती क्षितिज गाडेकर यांचा सत्कार माननीय सरपंच व शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सुधाकर खरात यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार सोबतच त्यास भेटवस्तू सुद्धा देण्यात आल्या.
क्षितिज ने त्याच्या यशाचे सर्व श्रेय वर्ग शिक्षिका सी आर रेपाळे मॅडम व मार्गदर्शक शिक्षक गडीकर सर यांना दिले .
क्षितीज ने यावेळी भविष्यात आय.ए.एस.अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले.
सदरील सत्कार प्रसंगी क्षितिजचे वडील जितेंद्र गाडेकर व आई छाया गाडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व्ही बी गडीकर सर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पी व्ही बोडखे सर यांनी केले.