pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जयश्री सोनकवडे यांची जातीय द्वेषभावनेतून बदनामी करणाऱ्या विरूध्द कारवाई करा   महिला कॉग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांची सामाजिक मंत्र्याकडे मागणी

0 3 8 6 5 4

जालना/प्रतिनिधी,दि.11

जात पडताळणी समितीच्या विभागीय उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांची जातीय द्वेषभावनेतून बदनामी  करणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात महिला कॉग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी केली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात नंदा पवार यांनी म्हंटले आहे की, श्रीमती जयश्री सोनकवडे ह्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या विभागीय जात पडताळणी समितीच्या  विभागीय उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. एका मागासवगय कुटुंबातील जयश्री सोनकवडे यांनी मेहनतीने आपलं शिक्षण पूर्ण कुरुन एक महिला असतांना सुद्धा मोठ्या पदावर पोहचल्या. प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण झालेल्या श्रीमती जयश्री सोनकवडे यांची सामाजिक न्याय विभागातील काही कामचुकार व भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी महिलांना हाताशी धरून बदनामी करण्याचा उद्योग सुरू केला. प्रादेशिक उपायुक्त जलील शेख यांच्या गलथान आणि निष्क्रिय कामामुळे इतर मागास बहुजन कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सुरू असलेल्या जालना येथील आन्वी, तुपेवाडीच्या आश्रमशाळेची 2019 मध्ये सोनकवडे ह्या उपसंचालक असतांना त्यांनी चौकशी केली.  नंदिनी पवार या विद्यार्थ्यांनीचा उपचार न दिल्याने तडफडून मृत्यू झाला आणि फुलमाळी या विद्यार्थ्यांस उपचारांसाठी रुग्णालयात लवकर दाखल करण्यात आले नसल्याने त्यामुळे त्यांचा पाय कापावा लागला आहे. याबाबत तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन सोनकवडे यांनी दिले होते. यांचा राग मनात धरून समाजकल्याण विभागाच्या जातपडताळणी उपआयुक्त जयश्री सोनकवडे यांना बदनाम करण्यासाठी समाज कल्याण विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांनी महिलांच्या माध्यमातून षडयंत्र  रचले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मृत्यू प्रकरणात दोषी असूनही समाज कल्याण विभागाने प्रादेशिक उपायुक्त जलील शेख याचे निलंबन केले नाही. व अजूनही चौकशी केलेली नाही. एका आदिवासी गरीब कुटुंबातील मुलांना आजही न्याय मिळाला नाही. उपरोक्त प्रकरणात आपल्यावर कारवाई केली जाईल, या भीतीने जलील शेख व सध्या प्रादेशिक उप आयुक्त दिपक खरात हे महिलांना हाताशी धरून व खोटे आरोप करून श्रीमंती सोनकवडे यांची बदनामी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एका मागासवगय तसेच प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या  श्रीमती सोनकवडे यांची बदनामी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई यावी अशी मागणी देखील या निवेदनात नंदा पवार यांनी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे