उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तनिवास, वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे
अरण मध्ये ४ऑगस्ट रोजी भक्त निवास व वास्तुशिल्प भूमिपूजन आणि भव्य मेळाव्यास उपस्थित राहावे - अभिमन्यु उबाळे

जालना/प्रतिनिधी,दि.28
अरण (ता. माढा) जि. सोलापूर हे संत शिरोमणी सावता महाराज यांचे गाव , अकराव्या शतकापासून जगाला कर्मनिष्ठेचा संदेश देणारे हे वारकरी संप्रदायाचे प्रथम संत म्हणून परिचित आहेत शिवाय त्यांची संजीवनी समाधी देखील तेथे आहे , परंतु अश्या पवित्र तिर्थक्षेत्र स्थळी आजपर्यंत कुठलाही विकास झालेला नाही महाराष्ट्रातील हे तीर्थक्षेत्र अजूनही विकासापासून कोसो दूर आहे.तीर्थ क्षेत्र अरण विकासासाठी आणि विविध विकास कामांच्या भूमी पूजनासाठी रविवार , ४ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी 12:30 मिनीटाने सावता महाराज भक्त परिवार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी भक्त निवास व वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा ना मंत्री छगन भुजबळ साहेब,गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना अतुल सावे, खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार समीर भुजबळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार योगेश टिळेकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार प्रज्ञा सातव, आदी उपस्थित रहाणार आहेत तरी सर्व समाज बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून माळी एकजूट दाखवुन द्या असे आवाहन एकता परिषद अध्यक्ष अभिमन्यु उबाळे यांनी केले आहे