मोर्शी तालुक्यातील शेतातील पांदण रस्त्याची वाट बिकटशेतकरी त्रस्त; पांदण रस्ते योजनेबाबत शेतकऱ्यांचा संताप

ता प्रतिनिधि मोर्शी,दि.20
या वर्षी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने बळीराजा हतबल झाला आहे. हजारो रुपये खर्च करून शेतात पिकांची लागवड केली. त्यात कमी अधिक पावसामुळे हातातून पिके गेली. उरल्यासुरल्या पिकांवर शेतकऱ्यांची मदार होती. मात्र, शेतात जाणारे वहवाटीचे पांदण रस्ते या पावसामुळे प्रचंड खराब झाले आहे. त्यात शासनाचे दुर्लक्ष यामुळे वाताहात झालेल्या या रस्त्यातून कुठलेच यंत्र, बैलबंडी, सोयाबीन काढणी यंत्र, ट्रॅक्टर अन्य वाहन शेतापर्यंत जात नसल्याने मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी ही मुख्य पीके शेतातच पडून आहे.शेतकऱ्यांची शेती या पांदण रस्त्यावर आहे. त्या तीन एकरवर त्यांनी या वर्षी सोयाबीन या पिकाची लागवड केली. शेतातील पीक घरी आणण्यासाठी त्यांची सद्यस्थितीत धडपड सुरू आहे. मात्र, त्यांच्या शेतात जाणारा वहीवाटीचा पांदण रस्ता मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त करण्यात आला नाही. अशा परिस्थितीत शेतातील बैलगाडी, ट्रॅक्टर किंवा पीक काढणी यंत्र, शेतात जात नसल्याने शेतातील पीक घरी आणणार कसे, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. आपल्या शेतात हजारो रुपये खर्च करून शेतात पिकांची लागवड केली. त्यात संततधार पावसामुळे हातातून पिके गेली. मात्र, उरलेसुरल्या पिकांवर शेतकऱ्यांची मदार होती, तर शेतात जाणारे वहवाटीचे पांदण रस्ते या पावसामुळे प्रचंड खराब झाले आहे. वाताहात झालेल्या या रस्त्यातून कुठलेच यंत्र, बैल बंडी, सोयाबीन काढणी यंत्र, ट्रॅक्टर अन्य वाहन शेतापर्यंत जात नसल्याने मोर्शी तालुक्यातील निंभार्णी येथील हजारो शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात पडून आहे. जर योग्य वेळी सोयाबीनची काढणी झाली नाही, तर उरल्यासुरल्या सोयाबीनच्या शेंगा ही आता फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चितेसह संताप व्प्यक्त केला आहे.
पांदण रस्त्यांची लागली वाट
मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाती आलेले सोयाबीनचे पीक अक्षरशः मातीमोल झाले आहे. शेतकऱ्यांच्या कापूस पिकालाही या मोठा फटका बसला. मात्र, आता मागील दिवसांपासून पाऊस थांबला असल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला, तरी त्याच्या समोरची संकटाची मालिका संपता संपत नाही. शेतात उरले सुरले सोयाबीन शेतकरी काढण्याच्या तयारीत आहे. मात्र, शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्याची परिस्थिती पावसामुळे बिकट झाल्याने शेतातील शेतमाल काढून घरी कसा आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना समोर उभा ठाकला आहे पांदण रस्त्याअभावी शेतमाल शेतातच आहे पडून ः मी माझ्या तीन एकर शेतात या वर्षी सोयाबीन पिकाची लागवड केली. परंतु, शेतात जाणारा पांदण रस्ता पूर्णत: खराब असल्याने ट्रॅक्टर अथवा बैलगाडी किंवा अन्य कोणतही वाहन शेतापर्यंत जात नसल्याने शेत माल शेतात तसाच पडून आहे , अशी प्रतिक्रिया निंभार्णी येथील शेतकरी यांनी व्यक्त केली.
शासनाची पांदण रस्ते योजना ठरली कुचकामी ः दोन वर्षांपुर्वी राज्यात मातोश्री समृद्धी शेत पांदण रस्ते योजना उदयास आली होती. मोठा गाजावाजा करीत कोट्यवधी रुपये या योजनेसाठी खर्च करण्यात आले. शेतातील कच्चे वहिवाट व पांदण रस्ते तयार करणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश होता. मात्र तालुक्यातील निंभार्णी शिवरा पांदण रस्त्यांची एकंदरीत अवस्था पाहता, ही योजना कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे.



