ब्रेकिंग
सुरंगली येथे मंगलाआई अंबा भवानी देवीची यात्रा बारा गाड्या उत्साहात संपन्न

0
3
2
4
1
2
भोकरदन/प्रतिनिधी, दि.16
भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे प्रती वर्षी प्रमाणे अंबा भवानी मंगलाई देवीची यात्रा उत्सव साजरा करण्यात आला. नवसाच्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. त्या नंतर रात्री रात्र भर वाघ्या मुरळी चां जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मासुळ येथील कलापथक यांनी वाघ्या मुरळी चां जागरण कार्यक्रम केला. त्या नंतर सकाळी 5 वाजता अंबा भवानी मंगलाई देवीची स्वारी काढण्यात आली.बोल अंबा भवानी की जय घ्या घोषणेने परीसर दणाणून गेला. अनेक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. रात्रभर अनेक देवतांची सोंगं काढण्यात आली. सदरील कार्यक्रम शांततेत पार पडला.
0
3
2
4
1
2