pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

गोरगरीबांचा विकास झाला तरच भारतरत्न डॉ. बाबासाहेबांची स्वप्न पुर्ण होईल – बाबासाहेब वानखेडे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 11,132 लाडु वाटप

0 1 2 1 1 2
जालना/प्रतिनिधी,दि.15
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करून आनंदोत्सव साजरा करण्यापेक्षा  गोरगरीबांचा विकास झाला तरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे स्वप्न पुर्ण होईल, असे प्रतिपादन मॉ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जूना जालना, मस्तगड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाठिकाणी  डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदन म्हणण्यात आली. यावेळी सहाय्यक समाज कल्याण आयुक्त आमित घवले, आ. राजेश टोपे, आ. कैलाश गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, भास्कर दानवे, रवि राऊत, ॲड. ब्रह्मानंद चव्हाण,  दिनकर घेवंदे, सुरेश रत्नपारखे, पिंटु रत्नपारखे, महेंद्र रत्नपारखे, दलितमित्र बाबुराव मामा सतकर,  कडुबा वाकीकर, शिवलाल घाडगे, शिवाजी आदमाने, अनिल वानखेडे, अनिल खरात, हरेष रत्नपारखे,  संदीप हिवराळे, स्वप्नील गायकवाड, प्रकाश मगर, ॲड. संजय काळबांडे, रविंद्र मगरे, सचिन पगारे, संदीप रत्नपारखे, निलेश रत्नपारखे, सुनिल साळवे, सुभ ाष घाडगे, गंगुबाई वानखेडे, मंगला खांडेभराड, शंकर सातपुते, दिपक वैद्य, दशरथ तोंडुळे आदिंची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना बाबासाहेब वानखेडे म्हणाले की, उठा, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हा मूलमंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. एकाच झेंड्याखाली या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करण्याची जबाबदारी आपली आहे. सक्षम विचारांचा समाज निर्माण झाला पाहिजे. कोणावर अन्याय होत असेल, त्याला सनदशीर मार्गाने वाचा फोडली पाहिजे. कायद्याचे राज्य आहे, घटनेने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. प्रत्येक नागरिकाला डॉ. बाबासाहेबांनी सन्मान मिळवून दिला आहे, त्यांचा आपल्याला स्वाभीमान आहे. जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरूष, बोधीसत्व, भारतरत्न, आधुनिक भारताचे जनक, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी  11,132 लाडु वाटप करण्यात आले. तसेच जारचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी  कदीम ठाण्याचे पो.नि. माने, जमादार कैलास जावळे व कर्मचाऱ्यांनी  चोख बंदोबस्त ठेवला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाडुचे वाटप करतांना बाबासाहेब वानखेडे, सुरेश रत्नपारखे व इतर दिसत आहे. (छाया- किरण खानापुरे)
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2