pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाअंतर्गत साफसफाई.

0 1 7 4 0 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25

मागील महिन्या प्रमाणे दिनांक २४/११/२०२३ रोजी उरण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सदर अभियानात उरण शहरातील तहसील कार्यालय परिसर ते मशीद मोहल्ला ते महात्मा गांधी पुतळा ते हरीपांडवपथ पर्यंत परिसरात स्वछता अभियान घेण्यात आले . सदर अभियानात एकूण ३ टन कचरा उचलण्यात आला. या अभियानात उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, लेखापाल सुरेश पोसतांडेल, बांधकाम अभियंता झुंबर माने , आरोग्य निरीक्षक हरेश तेजी , प्रशासकीय अधिकारी अनिल जगधानी, कर निरीक्षक संजय डापसे, तसेच उरण नगर परिषदेचे सफाई कर्मचारी / मुकादम यांचे श्रमदानातून स्वछता अभियान पार पडले. तसेच उरण नगर परिषद शाळा क्र १,२,३ चे शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी सदर अभियानात भाग घेऊन श्रमदान केले. या अभियानामुळे उरण नगर परिषद हद्दीतील परिसर स्वच्छ व सुंदर झाले.शहर स्वच्छ व सुंदर झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या अभियानाचे कौतुक करत नागरिकांनी नगर परिषदेचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे