भोकरदन तालुक्यातील श्री काशी विश्वेश्वर क्षेत्र सुरंगली येथे महाशिवरात्रिनिमित्त सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहस प्रारंभ

भोकरदन/प्रतिनिधी, दि.25
भोकरदन तालुक्यातील श्री काशी विश्वेश्वर क्षेत्र सुरंगली येथे महाशिवरात्री महोत्सवास सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहस प्रारंभ झाला असुन दिनांक 20 फेब्रुवारी रोजी गुरुवारी रोजी प्रारंभ झाला आहे.सांगता महाशिवरात्री ला बुधवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे.ह.भ.प. दत्ता महाराज गोदींकर यांच्या सुमधुर वाणीतुन श्रीमद् भागवत कथा वाचन होत आहे त्यांना हार्मोनियम वादक गजानन वानखेडे, तबलावादक रमेश टोंपे, दादा महाराज जाधव, एकनाथ पाटील,देविदास् राऊत हे भजनी मंडळी साथ देत आहेत दररोज अन्नदाता कडुन पंगतीचे आयोजन करण्यात आले आहे.महाशिवरात्र ला शाबुदांना खिचडी चे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री ला रात्री श्री काशी विश्वेश्वर ला लघूरुद्र अभिषेक करण्यात येणार असुन गावातुन पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.दिनांक ,28 फेब्रुवारी शुक्रवारी रोजी महाप्रसादाचे भंडारा आयोजित करण्यात आला आहे.सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकरी यांनी केले आहे.