ब्रेकिंग
ग्रामपंचायत नवघर तर्फे दिव्यांगांना निधी वाटप.
0
3
1
0
3
5
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.4
उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत मार्फत वर्षभरात शासनाची विविध सेवा सुविधा,योजना, अभियान प्रभावीपणे राबविले जातात. शासनाच्या सेवा सुविधा तळागाळात, सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम नवघर ग्रामपंचायत मार्फत सुरू असून नवघर ग्रामपंचायतीने स्वतःच्या उत्पनाचे ५ % दिव्यांग कल्याण निधीतून नवघर,नवघर पाड़ा, कुंडेगाव येथील २२ अपंग लाभार्थ्यांना प्रत्येकी २०,००० रूपये व्यवसायासाठी वाटप केले. तसेच जुलै महिन्यात रुपये १२००० प्रमाणे २६४०० असे एकूण ७७४०००रुपये दिव्यांगाना वाटप केले. यावेळी सरपंच सविता मढवी,उपसरपंच दिनेश बंडा, ग्रामविकास अधिकारी गुरुप्रसाद म्हात्रे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते.
0
3
1
0
3
5