कुसुम पाटील यांचे दुःखद निधन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.07
केगाव आवेडा येथील सौ. कुसुम भास्कर पाटील यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी शुक्रवार दि ३ जानेवारी २०२५ रोजी आकस्मिक दुःखद निधन झाले. अत्यंत मनमिळाऊ व प्रेमळ असा त्यांचा स्वभाव होता. सर्वांच्या सुख दुःखात त्या नेहमी सहभागी व्हायच्या. सौ. कुसुम भास्कर पाटील यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कुसुम पाटील यांच्या निधनाने पाटील परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी मोठा जणसमुदाय उपस्थित होता.कै. सौ. कुसुम पाटील यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी उरण तालुक्यातील दांडा स्मशानभूमी येथे सकाळी ७ वाजता होणार आहे. तर दिवसकार्य विधी मंगळवार दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी केगाव आवेडा येथे सकाळी १० वाजता होणार आहे. या दुःखद कार्य प्रसंगी कोणतेही दुखवटे स्वीकारले जाणार नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.