सोनार समाजातील बटुंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न

पुणे/वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,दि.6
पुणेः- सोनार समाजातील बटुंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा नुकताच पुणे परिसरातील ‘सिध्देश्वर मंगल कार्यालय’,पेरणेफाटा याठिकाणी पार पडला.यावेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहुन आलेल्या ३०बंटुवर व्रतबंध संस्कार करण्यात आले.होम-हवन आदी धार्मिक विधीवत ,पुजाअर्चा करुन हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमसाठी सोनार समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.सुप्रसिध्द सराफा व्यावसायिक अविनाश पंडीत यांनी उपनयन संस्काराचे महत्व आपल्या अध्यक्षीय भाषणातुन व्यक्त केले.
हिंदु संस्कृती मधील सोळा संस्कारापैकी महत्वाचा मानला जाणारा व्रतबंध हा संस्कार सोनार समाजामध्ये पारंपरिक प्रथेनुसार सनातन वैदिक संस्कृती प्रमाणे विधीवत होम-हवन करुन पार पाडला जातो .तसेच हा संस्कार अतिशय महत्त्वाचा आहे.असे मत व्रतबंध सोहळ्याचे पौरोहित्य करणारे माधव विनायक वेदपाठक उर्फ नमो गुरुजी यांनी व्यक्त केले.संपूर्ण कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदपाठक गुरुजी,अक्षय कडेकर गुरुजी व अनुप दिक्षीत यांनी केले.
याप्रसंगी माढा येथील सराफ व्यावसायिक प्रमोदभैय्या वेदपाठक देडगाव येथील मधुकर क्षिरसागर देडगावकर,ग्रामीण कथालेखक बबन पोतदार,वांबोरी येथील अरविंद घोडके त्याचप्रमाणे शिरुर मतदार संघाचे आमदार अशोकबापु पवार,प्रदीपदादा कंद लोणीकंद,वाघोली गावचे सरपंच माऊली कटके,डोंगरगावच्या माजी सरपंच सौ.रजनी धर्मा धिकारी इत्यादी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर बटुंना आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.धार्मिक विधीच्या अखेरीस सर्व बटुंची सहकुटुंब दीक्षा व सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.यावेळी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार व पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी सर्व बटुंना सुविचार ग्रंथाचा संच आशिर्वादपर भेटीच्या स्वरुपात देण्यातआला.
श्री संत नरहरी पांचाळ सोनार समाज विकास महासंघ,पुणे च्या वतीने हा सामुदायिक उपनयन (मुंजी)सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महासंघाचे विद्यमान अध्यक्ष गोपाळ वेदपाठक,मुकुंद महामुनी,ज्ञानेश्वर धर्माधिकारी,पंढरीनाथ धर्माधिकारी,भास्कर दिक्षीत, पद्माकर धर्माधिकारी,सौ.कांताबाई धर्माधिकारी ,प्रदीप सोनार,श्यामकुमार वेदपाठक,मोहन महामुनी,एच.एम.पंडीत,सागर महामुनी,सोमनाथ धर्माधिकारी,प्रशांत धर्माधिकारी,सौ.हेमलता धर्माधिकारी,ज्ञानेश्वर दिक्षीत,गिरीश वेदपाठक,सविता धर्माधिकारी,मनिषा धर्माधिकारी,सुनिता धर्माधिकारी,पुंडलिक धर्माधिकारी,ओंकार दिक्षीत आणि सुहास धर्माधिकारी आदींनी परिश्रम घेतले.संपुर्ण समारंभाचे सुत्रसंचलन सागर श्यामराव वेदपाठक तरआभार प्रदर्शन वैभव वेदपाठक यांनी केले.