जालना शहरात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शहर महापालिकेने जागा द्यावी व सदरील पुतळा उभारण्यासाठी लागेल तेव्हढा आमदार निधी देणार असल्याची ग्वाही आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली. तर महात्मा जोतिबा फुले यांनी 19 व्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण करून समानतेचे विचार मांडले. त्यामुळे महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यकाळातही नितांत आवश्यक असल्याचे प्रतिपादन जालना शहर महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिले.
महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 वी जयंती 11 एप्रिल 2025 रोजी जालना शहर मनपा परिसरात लाडुचा प्रसाद वाटून उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी उभयंते बोलत होते.
यावेळी पोलिस अधिक्षक अजयकुमार बंन्सल, उपायुक्त प्रियंका राजपुत, श्रीमती गायकवाड, जालना शहर मनपाचे कार्यालयीन अधिक्षक विजय फुलंब्रीकर, आनंद अंभोरे, राजेश कुरलिये, अरूण वानखेडे, अभियंता सऊद, बंडु चव्हाण, लेखा विभागाचे वरिष्ठ लिपीक सचिन मेहरा, माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, भाऊसाहेब घुगे, धरम इंगळे, सुधाकर निकाळजे, रोहिदास गंगातिवरे, दिनकर घेवंदे, योगेश रत्नपारखे, लक्ष्मण ईधाटे,गंगुबाई वानखेडे, मंगला खांडेभराड, बाबासाहेब वानखेडे, मंजु घायाळ, वंदना खांडेभराड, पंडीतराव भुतेकर, दिपक वैद्य, संतोष जमधडे, शंकर घोडके, अमोल धानुरे, शिवकुमार राऊत, सचिन वानखेडे, कृषी अधिकारी कापसे, अमरदिप शिंदे, नितीन इंगळे, ॲड. रामेश्वर खांडेभराड, अमोल अंभोरे, सुरेश रत्नपारखे,पोलिस निरीक्षक माने, कदीम जालनाचे पो.नि. माने, गणेश जाधव, कडुबा वाकीकर, संतोष गायकवाड,गणेश चौधरी, वैजीनाथ नागरे, विमलबाई लोखंडे, यमुनाबाई गरड, नितीन तायडे, राजेंद्र तिडके, शंकर तारो, गुरूमीतसिंह सैना, निलेश वानखेडे, सचिन वानखेडे, गणेश तरासे, भगवान तोडुळे, विजय तोंडुळे, ऋतुजा खरात, सचिन वानखेडे, निखील पगारे, सुनिल रत्नपारखे, बाबा पठाण, फिलीप्स उगले, अर्शद बागवान, नंदकिशोर जांगडे, बाबुराव मामा सतकर , शेख इब्राहिम, दशरथ तोंडुळे यांच्यासह बसपा, रिपाइं, रिपाइं, अ.भा. समता परिषद, महात्मा फुले विचार मंच, माळी महासंघ या संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अर्जुनराव खोतकर यांनी महात्मा फुले यांचे विचार मनात घेवून कार्य करावे, सावित्रीबाई फुले यांचा पुणाकृती पुतळा जालना शहरात मनपाने जागेची पाहणी करून, पुतळा उभारावा, या पुतळ्यास आमदार फंडातून निधी दिला जाईल, असे सांगितले. आयुक्त संतोष खांडेकर यांनी संविधानाची शपथ घेवून, यांच्या विचाराने कार्य करावे, व त्यांचे स्वप्न पुर्ण करावे, असे ते म्हणाले. यावेळी भास्कर अंबेकर यांनी सावित्रीबाई फुले पुतळा शहरात बसविण्यात यावा, व त्यांच्या विचारावर सर्व समाजाने कार्य करावे असे आवाहन केले.
सुत्रसंचलन संतोष जमधडे यांनी केले. प्रास्ताविक दिपक वैद्य यांनी तर आभार आयोजक बाबासाहेब वानखेडे यांनी मानले. यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
आज रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 जयंती 11 एप्रिल 2025 रोजी जालना शहर मनपा परिसरात लड्डू वाटून उत्साहात साजरी करण्यात आली छायाचित्र किरण खानापुरे