कायदेविषयक शिबीर अंकुशराव टोपे महाविद्यालयात संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.16
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी सुचनेप्रमाणे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्याकडून शुक्रवार दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता अंकुशराव टोपे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जालना येथे कायदेविषयक शिबीर संपन्न झाले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा न्यायाधीश एस.आर.तांबोळी, व तिसरे सहदिवाणी न्यायाधीश तथा प्रभारी सचिव डॉ. विकास कारमोरे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित, उपप्राचार्य डॉ. रमेश भुतेकर, डॉ. महेमुद अन्सारी, डॉ. अविनाश भालेराव व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी डॉ. विकास कारमोरे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम- 2005, महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम- 2015, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच एस.आर. तांबोळी यांनी लैंगिक गुन्ह्यांपासुन बालकांचे संरक्षण कायदा आणि पीडितांसाठी नुकसान भरपाई योजनेबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अविनाश भालेराव यांनी केले तर आभार डॉ. रमेश भुतेकर यांनी मानले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.