जागृत मतदार बांधवांनो जागे व्हा ! आपले अमुल्य मते देण्याअगोदर खालिल कविता लक्षात घेऊन देशहितासाठी मतदान योग्य उमेदवारास मतदान करा ! महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहिर दिगु तुमवाड यांचे आव्हान

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.21
सुज्ञ मतदारांनो देशात सध्या चालू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकित आपले अमुल्य मते देताना अनेक वेळा विचार करा!
खालिल कविता महाष्ट्रातील प्रसिध्द शाहिर दिगु तुमवाड हे कोणत्याहि पक्षाचे नसुन मतदारांना कवितेच्या माध्यमातून जागे करण्यासाठी मतदारांनी कविता पहा आपले अमुल्य मते योग्य उमेदवारास देऊन देश सुजलाम सुफलाम करा शाहिर दिगु
चोर निघाला चौकीदार
किव त्याची करू नका!
लबाड त्याच्या ऐकून गोष्टी,दया तयावर करू नका!!
केला त्याने महाघोटाळा!
ओळखा त्याचा ढोंगी चाळा!
चोर असोनी शिरजोर झाला!
हाकलून देण्या विसरू नका!!
सार्वजनिक संस्थाने याने
विकून टाकली दोस्तांना!
दारीद्रयाची रेषा ओलांडली,
काही कारण नसताना!
भांडवलदारांचे भरली घरे,
भरवसा आता धरू नका!!
धार्मिक भोळे भारतीय जन!
धर्मा आडूनी करी कुवर्तन!
गाई आडून शिकार करतो,
भाषषणास त्या भूलू नका!!
हिंदू धर्माचा पाईक म्हणतो!
हिंदू शेतकरी पायी रगडतो!
शेतमालालाचे भाव पाडीतो!
डोक्यावर त्यासी घेऊ नका!!
धर्माधर्माचे लावी भांडन!
जाती जातीचे करितो कांडन!
नाना खोड्या करून सत्ता,
घेणार्याला फसू नका!!मुह मे राम बगलमे छुरी!
जमवितो जनता राममंदिरी!
देवालाही फसवू पाहे
विश्वास त्याचा धरु नका!!
हुकुमशाही गाजवितो हा!
आराजकता माजवितो हा!
विरोधकांना जेल दावितो,
सत्ता तयासी देऊ नका!!
असे मतदारांना आव्हान शाहिर .दिगु तुमवाड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली