pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कायदा व सुव्यवस्था याविषयी जिजाऊ इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल जाफराबाद येथे एक दिवशी शिबिर संपन्न

0 1 1 8 1 1

टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.29

मा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या कार्यक्रम पत्रिका अन्वये
तालुका विधीसेवा समिती जाफराबाद आणि तालुका वकील संघ जाफराबाद तसेच राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल जाफराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल जाफराबाद येथे कायदेविषक प्रबोधनाचे शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
सदरील शिबिरासाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती. अपर्णा डी. गाडे दिवानी न्यायाधीश जाफ्राबाद यांनी भूषविले, उपाध्यक्ष म्हणून श्री युवराज सी. पाटील सहदिवाणी न्यायाधीश जाफ्राबाद हे उपस्थित होते. तसेच जिजाऊ ग्रामीण विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष संजयजी लहाने सर यांची विशेष उपस्थिती होती, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून श्री एस. पी. साळवे विशेष सरकारी वकील जाफ्राबाद यांनी आपली उपस्थिती दर्शिवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. पी. सिरसाठ (विधिज्ञ) यांनी केले. या शिबिरामध्ये श्री व्ही डब्ल्यू जाधव यांनी ट्रॅफिक रूल संदर्भात मार्गदर्शन केले, तसेच युवराज सी. पाटील दिवाणी न्यायाधीश जाफराबाद यांनी बालकांसाठी असलेल्या कायद्याचे सखोल मार्गदर्शन केले.
श्रीमती अपर्णा डी गाडे दिवाणी न्यायाधीश जाफराबाद यांनी पोस्को अंतर्गत येणाऱ्या कायद्याविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच या कार्यक्रमासाठी श्री आर जी वाघमारे वरिष्ठ लिपिक तसेच श्री वि पी तांबेकर कनिष्ठ लिपिक यांनी मोलाचे सहकार्य केले.सदरील कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री फलटणकर सर तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 1