pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एमसीईडीतर्फे थ्री डी प्रिंटींग व रिव्हर्स इंजिनिअरिंग निवासी प्रशिक्षणाचे आयोजन

0 1 7 4 1 1

जालना/प्रतिनिधी,दि.22

उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) आयोजीत आणि महाराष्ट्र उद्योजक, व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष (मैत्री) मुंबई यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत अनुसुचित जाती (एस.सी.) प्रवर्गासाठी 45 दिवसीय निःशुल्क 3 डी प्रिंटींग व रिव्हर्स इंजिनिअरिंग या निवासी तांत्रीक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.
तांत्रिक अभ्यासक्र ३ डी प्रिंटींग व रिव्हर्स इंजिनिअरिंग संबंधित मूलभूत संकल्पना समजून घेणे, ऑटोकॅड, स्कनिंग, सोल्डीड वर्क्स, कॅटीया कॅड इ. अनेक विषयांवर प्रात्यक्षिकांद्वारे सविस्तर प्रशिक्षण तज्ञाद्वारे दिल्या जाईल. तसेच उद्योजकीय अभ्यासक्रम: उद्योजकीय व्यक्तिमत्व विकासशासकीय कर्ज प्रकल्प अहवाल उद्योग व्यवस्थापन उद्योग संघी बाजारपेठ पाहणी तंत्र संभाषण कौशल्य विपणन कौशल्य, बाजारपेठ व्यवस्थापनवा योजनाची माहितीउद्योग नोंदणी इ.
अनुसूचित प्रवर्गातील, वय 18 ते 45 वर्ष, स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची तीव्र इच्छा, पूर्णवेळ प्रशिक्षणास उपस्थित राहणे अनिवार्य, शिक्षण: किमान बारावी विज्ञान / Diploma/ Degree in Mechanical, Production, Electrical, Electronics, and Automobile उत्तीर्ण असावा सोबत मार्कशीट/आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र. शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी), पासपोर्ट साईझचे २ फोटो वरील सर्व कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रती जोडाव्यात.
तरी संबंधितांनी अधिक माहितीकरिता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी) अ-३८, एमआयडीसी रेल्वे स्टेशन एरिया, देवगिरी कॉलेज जवळ छत्रपती संभाजीनगर येथे श्री विनोद त्रिभुवन मो 9960339813 कार्यक्रम समन्वयक एम.सी.ई.डी. किंवा व्ही.पी तुपे, प्रकल्प अधिकारी एम. सी.ई.डी. औरंगाबाद मो. 9049228888 येथे त्वरित संपर्क करावा असे आवाहन श्री. डी. यू. थावरे, विभागीय अधिकारी एम.सी.ई.डी. श्री. स्वप्नील राठोड  महाव्यवस्थापक   छत्रपती संभाजीनगर जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे