मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत 6 एप्रिल रोजी अयोध्या यात्रेसाठी विशेष रेल्वेचे आयोजन
जिल्ह्यातील 800 लाभार्थी करणार अयोध्येकडे प्रस्थान
जालना/प्रतिनिधी,दि.3
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचा शासन निर्णयानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहुन अधिक वयाच्या जेष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याकरीता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील 800 लाभार्थ्यांना रविवार, दि. 6 एप्रिल, 2025 ते दिनांक 10 एप्रिल, 2025 या कालावधीत जालना येथुन अयोध्या श्रीराम मंदीर यात्रेसाठी विशेष रेल्वे प्रस्थान करणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यात्रेसाठी जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील 800 लाभार्थ्यांना तीर्थ दर्शनासाठी नेण्यात येणार असुन, सदर लाभार्थ्यांची यापुर्वी जिल्हास्तरीय समितीने निवड केली आहे. सदर पात्र लाभार्थ्यांची यादी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय जालना येथे लावण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पात्र लाभार्थ्यांने तीर्थदर्शन यात्रेसाठी आपल्या सोबत वैद्यकीय प्रमाणत्र, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो व आवश्यकता असल्यास औषधे व इतर आवश्यक वस्तु सोबत ठेवाव्यात असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.