pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त 1196  व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 11,132 लाडुचा महाप्रसाद वाटप

0 1 7 3 7 7
जालना/प्रतिनिधी,दि.8
जालना शहरात महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त 1196  व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 11,132  लाडु महाप्रसादाचे वाटप होणार असल्याची माहिती बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे यांनी दिली.
महात्मा ज्योतीबा फुले जयंती यांची जयंती 11 एप्रिल रोजी तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी होणार आहे. 11 एप्रिल रोजी जालना नगर परिषद कार्यालयासमोर तर 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मस्तगड यांच्या पृर्णाकृती पुतळ्यासमोर लाडुचे वाटप करण्यात येणार आहे.
या महाप्रसादासाठी  अध्यक्ष सुरेश रत्नपारखे, शासकीय कंत्राटदार  सुभाषचंद्र देविदान, दलितमित्र बाबुरावमामा सतकर,गणेशराव रत्नपारखे,बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे, ॲड. रामेश्‍वर खांडेभराड, ॲड. बागवान, रामभाऊ तायडे,  ॲड. अर्शद बागवान,ॲड. संजय काळबांडे, संदीप हिवराळे, सुरेश खरात, कडुबा बाकेकर, सुरेश मानकस, महेंद्र शिंदे, योगेश रत्नपारखे,संतोष परळकर, स्वप्नील गायकवाड, रविंद्र मगरे, विवेक रत्नपारखे, महेंद्र रत्नपारखे, सहाय्यक अभियंता समाधान म्हस्के, देवानंद डोईफोडे, राज स्वामी, ॲड. उमाकांत पैठणे, निखील रमेशराव पगारे, राज नरसिंगराव स्वामी, सदानंद बाबुराव गवई, अनिल पुरी, गवई,शिंदे, शैलेश घुमारे, बाबा पठाण, नगरसेवक अरूण मगरे, शासकीय कंत्राटदार शेख इब्राहिम, वैजीनाथ नागरे, अमोल रत्नपारखे, निलेश रत्नपारखे,शिवलाल घाडगे, दत्तात्रय खांडेभराड, गंगुबाई वानखेडे,मंगला खांडेभराड,दिवाकर मगरे,सुभाष सातपुते यांनी सहकार्य केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे