गारपीटीमुळे एक एकरमधील भाजीपाल्याचे नुकसान
शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान नुकसान भरपाई देण्याची मागणी

वडीगोद्री/तनवीर बागवान, दि.26
वडीगोद्री परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीने एक एकारातील गोबी, पालक, कोथींबीर व शेपू चे आतोनात नुकसान झाल्याने वडीगोद्री येथील शेतकरी कृष्णा श्रीमंत काळे यांचे होत्याचे नव्हते झाले आहे.
वडीगोद्री येथील कृष्णा श्रीमंत काळे यांची धाकलगाव शिवारात गट नंबर 271 मध्ये एक एकर शेती आहे.हे गेल्या अनेक वर्षा पासून आपल्या एक एकर शेतीतून कोबी पालक कोथिंबीर, मेथी, वांगे अशा प्रकारचा भाजीपाला लावून तो बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करतात मात्र मंगळवारी दुपारी झालेल्या अवकाळी व गारपीट मुळे गोबी , पालक, कोथींबीर व शेपू या भाजीपाल्याचे अतोनात नुकसान होऊन अंदाजे एका लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झाल्यामुळे केलेला खर्च ही वाया गेला असून सदर नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी कृष्णा श्रीमंत काळे यांनी केली आहे.
प्रतिक्रिया
मी एक एकर मध्ये गोबी,पालक,कोथिंबीर व शेपू लावली होती मात्र अचानक मंगळवारी गारपीट झाल्याने सर्वच भाजीपाला मातीत गेला यामुळे माझे एक लाख रुपयांचे नुकसान माझा उदरनिर्वाह यावर असल्याने मला नुकसान भरपाई द्यावी.
कृष्णा श्रीमंत काळे
शेतकरी, वडीगोद्री