राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमी चे घवघवीत यश..

जालना/प्रतिनिधी, दि.20
स्मार्ट किड् अबॅकस लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे जालन्यात राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा घेण्यात आली, यांची उपस्थिती भारतातील 27 राज्यांमध्ये आणि 23 देशांमध्ये देखील आहे, या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 300 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून किड्स कॅम्ब्रेज इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यiपीका सौ अलका गव्हाणे, कोठारी इंटरनॅशनल स्कूलचे प्रेसिडेंट विनय कुमार कोठारी, स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमी जालना च्या संचालिका जयश्री गोपाल बुट्टे यांची प्रमुख उपस्थित होती या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर , लातूर, परभणी, बीड, इत्यादी शहरांमधील 300 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता, जालना स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमी शिवनगर मधील समृद्धी दंदाले ह्या विद्यार्थिनींने C 3 कॅटेगिरी मधून प्रथम क्रमांक मिळवला, तसेच अंजनी खंदारकर या विद्यार्थिने B 3 कॅटेगिरी मधून प्रथम क्रमांक मिळवला, तनिष्का माळवदे या विद्यार्थिने B 3 कॅटेगिरी मधून द्वितीय क्रमांक मिळवला, आर्यन शेळके या विद्यार्थ्याने B 4 कॅटेगिरी मधून प्रथम क्रमांक मिळवला, तनवी सोनवणे या विद्यार्थिनींने B 4 कॅटेगिरी मधून द्वितीय क्रमांक मिळवला, जूनियर लेवल कॅटेगिरी मधून नैतिक गडवे या विद्यार्थ्याने तिसरा क्रमांक मिळवला, तसेच कॉनसेलेशन गोल्ड मेडेल मध्ये A 4 कॅटेगिरी मधून आशु शेख , A 3 कॅटेगिरी मधून राहील शेख, A 3 कॅटेगिरी मधून सानिध्य कांबळे, B 4 कॅटेगिरी मधून ऋतुजा मुटेकर, B 3 कॅटेगिरी मधून स्वरा ददाले इत्यादी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले यावेळी स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमी च्या संचालिका सौ. जयश्री गोपाल बुट्टे यांना बेस्ट फ्रेंचायसी अवॉर्ड मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात आला.
स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमी च्या यशस्वी विद्यार्थ्यासोबत संचालिका जयश्री गोपाल बुट्टे, शीतल पाटील,त्रिशिला भोसले आदी..