pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कुंबेफळ सिंदखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

संगीत राम कथा ज्ञान यज्ञ सोहळा सुरु

0 1 2 1 1 2

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.13

जालना तालुख्यातील कुंभेफळ शिंदखेड येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले असून ,या सप्ताहा मध्ये अनेक नामवंत कीर्तनकारांचे प्रवचन होणार आहे. या मुळे गावातील व परिसरातील भाविक मंडळीना मोठा लाभ होणार आहे.
योगेश्वर महाराजांच्या संजीवन सोहळ्या निम्मित सप्ताहाचे आयोजन केले आहे. हभप गुरुवर्य भगवान महाराज यांच्या हस्ते सप्ताहाचे कलशारोपण झाले.या वेळी त्यांनी भगवान बुद्ध यांचे विचार समाजातील सर्व घाटकांना किती महत्वपूर्ण आहे हे सांगितले.
या सप्ताहमध्ये दररोज अनेक नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनाचा आनंद मिळणार आहे. या मध्ये ,हभप सतीश महाराज बनकर पाचन वडगाव,हभप अनिल महाराज चेके शेंदुर्जन,हभप महादेव महाराज गिरी अंतरवाला, हभप निवृत्ती महाराज लकडे सावरगाव,हभप केशव महाराज चावरे पैठण,हभप शिवदास महाराज जंगले माजलगाव,सुधाकर महाराज वाघ पैठण यांच्या कीर्तनाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, अस संयोजक संपूर्ण गावकरी मंडळी कुंभेफळ शिंदखेड यांनी आवाहन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2