pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

फुंडे विद्यालयात वारकरी दिंडी व वृक्ष दिंडी.

दै जनप्रभात उरण तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

0 3 8 4 4 1

उरण/प्रतिनिधी,दि.5

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सण म्हणजेच आषाढी एकादशी होय. आषाढी एकादशी निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठल नामाच्या जयघोषात रंगून गेला आहे. वारकरी पंढरपुराच्या दिंडीत सहभागी झाले असताना फुंडे हायस्कूलचे विद्यार्थी देखील वारकरी दिंडीत रममाण झाले. उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे, तुकाराम हरी वाजेकर माध्यमिक विद्यालय फुंडे येथील विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी व वृक्षदिंडी मंगळवार दिनांक ५ जुलै, २०२५ रोजी नवघर गावात काढण्यात आली होती. सुरुवातीला विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, विद्यालयाचे प्राचार्य साळुंखे बी. बी. आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते विठुरायाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. एस डी म्हात्रे, एच एन पाटील, एस डी नाईक, पाटील पी. ए., सर्व सेवक आणि विद्यार्थी यांनी आरती म्हटली. त्या नंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीचा गीतांवर अप्रतिम नृत्य सादर केले. श्रीम. अस्मिता पाटील यांनी बसवलेल्या लेझीम पथकाने देखील उत्तम सादरीकरण केले. इयत्ता दहावी ब च्या वर्गाने वर्गशिक्षक एम.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची छान तयारी केली होती.
तदनंतर टाळ, विठू नामाचा जयघोष आणि लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडी आणि वृक्ष दिंडीने नवघर गावाकडे प्रस्थान केले. नवघर ग्रामस्थांनी वारकरी दिंडीचे मनःपूर्वक स्वागत केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आला. कुमार नचिकेत म्हात्रे आणि कु.लक्ष्मी मोटे, कु रक्षिता पंडीत, कुमार शिवतेज गायकवाड या विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात भक्तीगीतांचे गायन करून सर्वाना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी नवघर ग्रामपंचायत सरपंच सविता मढवी , उपसरपंच संध्या पाटील व स्कूल कमिटी सदस्य विश्वास तांडेल, ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच रवी वाजेकर, ग्रामसुधारणा मंडळ अध्यक्ष प्रणय कडू, योगेश तांडेल, नवेल तांडेल, भूपेंद्र पाटील, प्रशांत पाटील, संकेत तांडेल, अजय भोईर, कल्पेश जोशी उपस्थित होते. ही दिंडी यशस्वी होण्यासाठी उरण वाहतूक शाखा आणि उरण पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस अधिकारी वर्गाचे उत्तम सहकार्य लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी मिळून या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे