जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 13 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून या मतदानाच्या दिवसी प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे यासाठी उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज शनिवार दि. 11 मे 2024 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी जनतेला उत्वस निवडणुकीचा… अभिमान देशाचा या ब्रीद वाक्याचा महत्व पटवून देण्यात आलं.
तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेले बॅच खिशाला लावून त्यांना मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आलं. तसेच प्रत्येकाच्या माबाईलवर जनजागृती करण्यासाठी स्टीकर देखील लावण्यात आले. जालना लोकसभा निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी यांनी अटोकाट प्रयत्न सुरु केलेत. त्याला प्रतिसाद म्हणून उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मतदान करण्याबाबत आवाहन करुन मताचं महत्व पटवून देत, एक मत देशाच्या विकासासाठी असल्याचंही पटवून देण्यात आलं. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणाताई मोरे, आरती चौधरी, सोनल बागल, रमेश बागल, रामनाथ चौधरी यांची उपस्थिती होती.