pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

डॉ संजय गव्हाणे यांच्या प्रयत्नातून मारुती मंदिर परिसरात सभागृह बांधण्यासाठी 10 लक्ष निधी

ह भ प श्री उद्धव महाराज व ह भ प श्री कोंडीराम बल्हाळ महाराज व प्रा डॉ संजय गव्हाणे व अजबसिंग राजपूत यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन संपन्न

0 1 6 5 1 7

कन्नड/ कृष्णा घोडके,दि.7

कन्नड तालुक्यातील
देवगाव रंगारी येथिल पोलिस स्टेशन जवळ मारुती मंदिर परिसरात 10 लक्ष रुपये किमतीचे आर सी सी सभागृह बांधणे हे काम भाजपा जिल्हा सचिव डॉ संजय गव्हाणे यांच्या प्रयत्नाने मा ना अतुल सावे सहकार , ओबीसी व बहुजन कल्याण मंत्री म रा यांच्याकडून 2515 या हेड मधून मारुती मंदिर महिला भजनी मंडळाच्या आग्रहास्तव मंजूर करून दिले. त्या कामाचे भूमिपूजन हनुमान जन्मोत्सव निमित्ताने काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित असलेले ह भ प श्री उद्धव महाराज व ह भ प श्री कोंडीराम बल्हाळ महाराज व प्रा डॉ संजय गव्हाणे व अजबसिंग राजपूत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी
भाजपा तालुका सरचिटणीस किशोर भाऊ दिवेकर, तालुका उपाध्यक्ष ललित सुराशे, सर्कल प्रमुख सुभाष आण्णा सोनवणे, शहर अध्यक्ष नितिन गवळी, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जि सरचिटणीस एजाज सय्यद, भाजपा दिव्यांग आघाडी जि उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायके, युवा मोर्चा देवगाव रंगारी प स गण प्रमुख योगेश डोळस , युवा मोर्चा देवगाव शहर प्रमुख राजेंद्र उर्फ गोटू सोनवणे भाजपा ओबीसी मोर्चा ता चिटणीस गणेश सोनवणे मा ग्रा प सदस्य तथा भाजपा किसान मोर्चा ता उपाध्यक्ष सुनिल गवळी, भाजपा व्हाट्सअप्प ग्रुप अडमीन बाळू भाऊ रावते
,युवा नेते करण भांडवलदार,दत्तू काका रावते ग्रा प सदस्य नितीन भांडवलदार, संतोष फाळके, चंदू मिस्तरी गोरे, कमलाकर चौधरी, अशोक गवळी, कृष्णा नाना गवळी, माजी सदस्य गोकुळ गोरे, महिला भजनी मंडळ व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 6 5 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे