शिक्षण उपसंचालक मा. अनिल साबळे प्रा. शा. विल्हाडी ता. बदनापूर शाळेस भेट
शालेय विद्यार्थी,गावकऱ्यांशी साधला संवाद

जालना/प्रतिनिधी,दि.18
बदनापूर: आज (दि.18) रोजी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान’ अंतर्गत जि. प. प्रा. शा. विल्हाडी ता. बदनापूर या शाळेस मा.अनिल साबळे साहेब शिक्षण उपसंचालक विभाग छ संभाजीनगर यांनी भेट दिली.शाळेस भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी मा. साबळे साहेब यानी मुख्यमंत्री ‘ माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी सवांद साधला व विद्यार्थी गुणवता,प्रत्यक्ष विद्यार्थी संवाद मुलाखत, भौतिक सुविधा,गावकऱ्याचा सहभाग त्यांच्याशी चर्चा व मार्गदर्शन केले शालेय स्तरावराचे कामकाज पाहून त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी त्यांच्या सोबत मा. मंगला धुपे मा.शिक्षणाधिकारी तसेच बदनापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी क्षिरसागर दत्ता हे होते.