pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी आवाहन

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.18

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, दि. 20 जानेवारी, 2024 साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरले जात असून जालना जिल्ह्यातील इयत्ता पाचवी वर्गात सन 2023-24 मध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्यांनी त्यांचे पालकांसह सेवा केंद्रावरून व ईतर यंत्रणेचा वापर करून ऑनलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दि. 17 ऑगस्ट 2023 अशी होती.  तरी आता प्रशासकीय कारणास्तव ही मुदत वाढवून 25 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे व ऑनलाईन अप्लीकेशन चुका दुरूस्तीसाठीची तारीख 26 व 27 ऑगस्ट अशी आहे. जिल्हाभरातील सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज भरावेत , असे आवाहन प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, परतूर यांनी केले आहे.
इच्छुक विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांनी हयाची नोंद घेवून ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी पाचवीचे मुख्याध्यापकांकडुन प्रमाणपत्र पत्र भरून घ्यावेत व त्यावर विद्यार्थ्याचा फोटो, स्वाक्षरी व पालकांची स्वाक्षरी करून सदर प्रमाणपत्र हे मुख्याध्यापाकाद्वारे सत्यापित/प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुधारीत प्रमाणपत्र (Revised Certicate) हे खालील दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. फॉर्म भरण्यासाठीचे प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्ष-या हे १० ते १०० KB मध्ये स्कॅन करून संकेतस्थळ “www.navodaya.gov.in” यावरून भरावेत. विद्यार्थ्याचा जन्म हा दिनांक 01 मे 2012 पुर्वी व 31 जुलै 2014 नंतर झालेला नसावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे