पालकांनी अधिकृत मान्यताप्राप्त शाळेतच आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्याचे आवाहन

जालना/प्रतिनिधी,दि.3
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील शालेय विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याअगोदर संबधित शाळेला शासनाची मान्यता आहे किंवा नाही याची खात्री जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व) तसेच जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात करावी. मान्यता प्राप्त शाळा असेल तरच पालक, विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करून भविष्यात अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. शासनाची मान्यता नसलेल्या शाळेत प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही. तरी पालकांनी आपल्या पाल्याचे अधिकृत व मान्यताप्राप्त असलेल्या शाळेतच प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.