pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

देऊळवाडी येथे दत्त जयंतीचे आयोजन

0 1 7 4 1 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उरण शहरामध्ये देऊळवाडी येथे श्री दत्त मंदिर हे जागृत देवस्थान आहे. हिंदू धर्मात महत्वाच्या देवतेपैकी भगवान श्री दत्तात्रेय हे अनेक पंथाचे, अनेक उपासकांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे हिंदू धर्मात दत्त उपासनेला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे अनेक विविध जिल्ह्यातून भाविक भक्त नेहमी श्री दत्त मंदिर देऊळवाडी, उरण शहर येथे दर्शनासाठी नेहमी येत असतात.मंदिराची तसेच मूर्तीची स्थापना होऊन ९७ वर्षे पूर्ण झाली असून श्री दत्त मंदिराची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरु आहे. दरवर्षी दत्त जयंती निमित्त उरण मध्ये खूप मोठी यात्रा भरत असते.यंदा मंगळवार दि २६ डिसेंबर २०२३ रोजी दत्तजयंती असल्याने दत्त जयंतीचे औचित्य साधून देऊळवाडी येथील श्री दत्त मंदीरात पहाटे ३ वाजता श्रीचा अभिषेक, दुपारी १२ वाजता श्रींची आरती व नैवेदय, रात्री ९ वाजता श्रीचा पालखी सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी ओमकार बैरागी यांनी दिली. दरवर्षी देऊळवाडी यूवक मंडळ व देऊळवाडी ग्रामस्थ मंडळातर्फे भाविभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यंदाही भाविक भक्तांसाठी श्री दत्त मंदिर, देऊळवाडी येथे दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी देवदर्शन घेउन महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. असे आवाहन देऊळवाडी युवक मंडळ व देऊळवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे