pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राजमाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे 19 जुलैला घनसावंगी येथे आयोजन

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि. 17 

राज्यात महिला व मुलींवर होणारे क्रुर हिंसाचार व त्यातुन त्यांची केली जाणारी हत्या हे समाजासमोरील आव्हान ठरत आहे. त्यास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. तरी युवतींना स्वसंरक्षणाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दि.20 व 21 जुलै 2023 रोजी ऑल इंडिया थांग ता असोशिएशन यांच्याद्वारे दिले जाणार आहे. त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील महाविद्यालयीन युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभाग, घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

शाळकरी व महाविद्यालयीन तरूण-तरूणी यांची जीवनशैली खूपच बदललेली आहे. त्यानूसार सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. त्याकरिता वयोगट 15 वर्षे व त्यापुढील तरूनींणा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग व संत रामदास महाविद्यालय घनसावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 19 जुलै 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता संत रामदास महाविद्यालय, घनसावंगी येथे महिला व मुलींवरील हिंसाचार – संकल्पना व सद्यस्थिती तसेच सायबर गुन्हेगारी व मुलींना असलेले धोके या विषयावर तज्ञाचे मार्गदर्शन होणार आहे. विशेष उपस्थिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना  व जिल्हा कार्यक्रम अधिकारी कोमल कोरे, तसेच प्रमुख मार्गदर्शिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्या योगिता होके पाटील यांची असणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे