pub-7425537887339079
ब्रेकिंग

युनायटेड ग्लोबल फाउंडेशन ऑफ इंडिया तर्फे मोफत स्कूल बॅग चे वाटप

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.22

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध व्हावे या सामाजिक भावनेतून आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. अजूनही समाजात काही संस्था प्रत्यक्ष काम करतात, हे दुर्मिळ पण सुखद दृश्य आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे मान्यवर प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर सुसर साहेब , श्री दुर्गेश बनकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवावे, कठीण परिस्थितीतही जिद्द सोडू नये आणि मोठी स्वप्ने पाहावीत, असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला. आडगावचे प्रसिद्ध व्यापारी श्री. समाधान पाटील भोंबे यांनी या उपक्रम खूप प्रयत्नशील प्रयत्न केले UGFI संस्थे सोबत संपर्क साधून मुलांची परिस्थिती जाणीव करून दिली व त्याचे शब्दवर संस्थे ने हा उपक्रम राबवण्यात आला ,तसेच अध्यक्ष श्री. विकास भोंबे यांच्या विशेष सहकार्यामुळे शाळेला ही मदत उपलब्ध करून देण्यात आली. त्यांच्या सामाजिक जाणिवेमुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. काही लोक शांतपणे काम करतात, त्यामुळेच गावं उभी राहतात बाकी गोंधळ करणारे भरपूर असतात कार्यक्रमास गावाचे सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामस्थ तसेच अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. गावकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असे उपक्रम सातत्याने व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. राजेश बडगे यांनी केले शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी परिश्रम घेतले.यावेळी दुर्गेश बनकर मॅनेजिंग डायरेक्टर युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षण हेच सर्वात मोठे सामर्थ्य असून ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी संस्था कायम प्रयत्नशील राहील असा संदेश त्यांनी दिला दर्जेदार स्कूलबॅग मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे