pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा दीक्षांत समारोह संपन्न

0 1 7 4 1 4

मुंबई, दि. 23 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत झाला.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते डिजिटल माध्यमातून विद्यापीठाच्या ‘ई – प्रबोधिनी : लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रणालीचे उदघाटन करण्यात आले, तसेच ‘ब्लूप्रिंट ऑफ बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी’ या क्रमिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ ख्रिस्तोफर डिसुझा यांना डी लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
नाशिक येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे प्रकुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, केएलई अकादमी ऑफ हायर एजुकेशन अँड रिसर्च बेळगाव डॉ. नितीन गंगणे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जन. (नि.) डॉ. माधुरी कानिटकर, प्रकुलगुरु डॉ. मिलिंद निकुम्ब, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाल, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राधिकरणाचे सदस्य, अध्यापक व स्नातक उपस्थित होते.
दीक्षांत समारोहात १०३०२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. एकूण २६ उमेदवारांना पीएचडी तर १११ गुणवंत स्नातकांना सुवर्ण पदके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे