जिंतूर महामार्ग पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियान२०२४ दरम्यान आरोग्य तपासणी शिबिर.

जिंतूर/प्रतिनीधी,दि.8
महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ आय येथे महामार्ग पोलिस केंद्र जिंतूर येथे मा. अप्पर पोलिस अधीक्षक, (वाहतूक व दळणवळण) महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. पोलिस अधीक्षक महामार्ग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र अनिता जमादार, पोलिस उप अधीक्षक श्रीकात डिसले, पोलिस निरीक्षक एस.डी. पठाण, यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग जिंतूर येथे रस्ता सुरक्षा अभियान चे अनुषगाणे साई ऑप्टिकल चे डॉ. वानखेडे, वेलनेस फोरेव्हर चे मॅनेजर भोसले व जिंतूर महामार्ग पोलिस केंद्र याच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर आयोजन दि.४रवीवार रोजी करण्यात आले होते.
या वेळी महामार्ग पोलिस केंद्र येथील अधिकारी, कर्मचारी, तसेच वाहन चालक, व नागरिक याची बीपी, शुगर, नेत्र तपासणी तसेच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी जिंतूर महामार्ग केंद्र येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक जाधव, पोलिस उप निरीक्षक आय.ऐ. इनामदार , कदम तसेच वैद्यकीय स्टॉप, व पोलिस कर्मचारी नागरिक उपस्थित होते.