pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लोकसभा निवडणूक पारदर्शक व निर्भय वातारणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज -- जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल   - आचारसंहितेची कडक अंमलबजावणी - अवैध दारु, ड्रग्ज, रोख रक्कमा, शस्त्रास्त्रांवर बारकाईने लक्ष   - अफवा पसरविणाऱ्यांवर पोलीसांची करडी नजर - सोशल मिडियावरुन चुकीच्या बातम्या, अफवा पसरु नयेत - सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास सायबर पोलीस करणार कारवाई

0 1 7 4 0 7

जालना/प्रतिनिधी,दि.20

जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातारणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे,  अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि भयमुक्त वातावरणात निवडणुक पार पाडण्याकरीता पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी  उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 नूसार जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. लोकसभा निवडणूकीसाठी 23 स्थिर पथके स्थापन करण्यात आली असून कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे एकुण तीन सत्रात काम सुरु झालेले आहे. वाहनातून वाहून नेण्यात येणारी अवैध मद्य, पैसा याच्या तपासणीसाठी 23 चेकींग पाँईटची उभारणीही करण्यात आलेली आहे. फिरते पथकेही कार्यरत आहेत. व्हिडीओ सर्व्हलन्सच्या 21 टीम काम करत असून अकांऊंटींगच्या 3 टीम आहेत. खर्च निरीक्षकांसाठी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
शासकीय मालकीची कार्यालये, शासकीय वास्तु व त्यांच्या भिंतीवरील जाहिराती, भित्तीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊट, होर्डिंग्ज, झेंडे इत्यादी निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाल्यापासून 24 तासांच्या आत काढून घेणे किंवा झाकून घेणे बंधनकारक होते.  तर सार्वजनिक जागेवरील सर्व राजकीय जाहिराती, भित्तीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, होर्डिग्ज, कटआऊट इत्यादी निवडणूक़ जाहिर झाल्यापासून 48 तासांच्या आत काढून घेणे आवश्यक होते. सार्वजनिक जागा किंवा मिळकतीमध्ये बसस्थानक, बसथांबा, रेल्वे पुल, शासकीय बस व वाहन, विद्युत व टेलिफोन खांब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व इमारती यांचा समावेश होईल. तसेच खाजगी मिळकती किंवा जागेवरील सर्व अनाधिकृत राजकीय स्वरुपाच्या जाहिराती, भित्तीपत्रके, होर्डिंग्ज इत्यादी निवडणूक जाहीर झाल्यापासून 72 तासांच्या आत काढून घेणे बंधनकारक असल्याने ही कार्यवाही प्रशासनाकडून तत्परतेने वेळेत करण्यात आलेली आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात बंदुक अनुज्ञप्ती 654 कार्यरत असून आजपर्यंत 313 शस्त्रे जमा करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील अतिदक्षतेच्या मतदान केंद्रांची यादी तयार केली असून निवडणूक निरीक्षक आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन अंतीम केलेल्या अतिदक्षतेच्या मतदान केंद्रांची यादी जाहीर केली जाणार आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध दारुविक्री व हातभट्टींवर कारवाई करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस विभाग कार्यक्षम असून त्यांच्याकडून विविध कारवाया करण्यात येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून  अफवा पसरविणाऱ्या पोस्टवर सायबर पोलिसांची करडी नजर असून अफवा पसरविणाऱ्या पोस्ट शेअर करु नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशी माहितीही यावेळी दिली.
लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी) स्थापन करण्यात आलेली  आहे. यामध्ये प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक / सोशल मिडीयास देण्यात येणाऱ्या जाहिरांतीचे पूर्व प्रमाणिकरण करणे.  एखादी बातमी पेड न्यूज आहे का हे तपासून उचित कारवाई करणे, आदी कामे ही समिती करणार आहे. मुद्रीत माध्‍यमातील  (प्रिंट मिडीया) जाहिराती  मतदानाच्या  दिवशी  किंवा  मतदानाच्या एक  दिवस अगोदर प्रकाशित  करावयाची  असल्यास या जिल्‍हास्‍तरीय  समितीचे  प्रमाणपत्र  घेणे बंधनकारक  आहे. अशी माहितीही डॉ. पांचाळ यांनी दिली.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलिस विभाग दक्षता घेत आहे. राज्य शासनाकडून आणखी सीआरपीएफसह अतिरिक्त फोर्स मागविण्यात आलेला आहे. अवैध दारु, ड्रग्ज, रोख रक्कमा, अवैध शस्त्रात्रे यावर पोलिसांचे जास्त लक्ष असणार आहे. पोलीस विभागाने मागील तीन दिवसांत अवैध शस्त्रात्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर 36 केसेस  दाखल केल्या आहेत. एसएसटी व एफएसटी पथके सक्रीय झालेले आहेत.  जिल्ह्यात मोक्का अंतर्गत एक तर एमपीडीए अंतर्गत 4 अशा विविध कारवाई करण्यात आल्या आहे. तसेच देशी कट्टयावर कारवाईसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि कायदा व सुव्यवस्थेच्याबाबतीत कुठलीही अडचण न भासता सर्व परिस्थिती  अबाधित ठेवण्यात येईल. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे