pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि. 8

जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ जालना यांचे संयुक्त विद्यमाने मानेपुरी तांडा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे तालुका दि. 8 ऑगस्ट 2023 रोजी कार्यक्रम घेण्यात आला. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ, प्रमुख पाहुणे म्हणुन सरपंच श्रीमती राठोड, अॅड.जी.एन.मोरे, सहायक विधीज्ञ अॅड. ज्ञानेश्वर शेंडगे, व अॅड. ए.एस.लकडे आदि उपस्थित होते. तसेच ग्रामसेवक मानेपुरी तांडा व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व गावातील तरूण, जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक व महिला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. जी. एन. मोरे यांनी केले. नंतर अध्यक्षीय मार्गदर्शन सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य आणि विविध योजना तसेच जागतिक आदिवासी दिनाचे महत्व तसेच योजना याबद्दल मार्गदर्शन केले. गरजु तसेच सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना मोफत विधीज्ञ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कटीबध्द आहे असे सांगितले. सहायक लोक अभिरक्षक अॅड. ज्ञानेश्वर ए. शेंडगे यांनी उपस्थित गावक-यांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध योजनांची माहिती व महत्त्व याबद्दल विस्तृतपणे सांगितले. कार्यक्रमानंतर न्यायाधीश श्रीमती प्रणिता पी. भारसाकडे-वाघ, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना माच्या हाल- यांनी शाळेच्या आवारात वृक्षारोपन करण्यात आले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे