pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि.25

मातंग समाजाच्या उन्नतीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या जिल्हास्तरावर मेळावे घेऊन प्रचार, प्रसार व अंमलबजावणीसाठी दि. 25 जानेवारी 2024 रोजी  कार्यशाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथे पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे, महाव्यवस्थापक अनिल म्हस्के, प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक व्यवस्थापक के. बी. पवार तसेच जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक करुणा खरात व एमसीईडीच्या वैशाली कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेस समाज बांधवाचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांनी शासन स्तरावरील सर्व योजनांची सविस्त्‍ार माहिती देवून लाभार्थींनी जास्तीत जास्त्‍ा योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबईचे महाव्यवस्थापक अनिल म्हस्के उपस्थित होते. त्यांनी वेगवेगळया योजना तळागळातील लोकापर्यंत पोहचविण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्यांनी करावे व त्यांनाही प्रवाहात सामील करुन घ्यावे असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस. सोनवणे यांनी जिल्ह्यातील महामंडळाचा अहवाल सादर केला. तसेच राबविलेल्या योजनांची माहिती देत मातंग समाजाच्या उन्नतीसाठी ज्या योजना राबवण्यात येतात त्या योजनांचा लाभ तळागळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी प्रचार व प्रसिध्दीसाठी मेळावे आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. या प्रसंगी ज्या लाभार्थ्यांनी पुर्ण कर्ज परतफेड केल्या बद्दल दगडुजी खणपटे, भिवा हिवाळे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रविकांत जगधने, सुभाष आठवले, शिवराज जाधव, चंद्रकांत कारके, भास्कर खंदारे व मानकर इत्यादीनी आपल्या समस्या मांडुन मनोगत व्य्‍ाक्त्‍ा केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष साबणे यांनी केले तर आभार सचिन गोफणे यांनी मानले. असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे