अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या पदाची भरती

जालना/प्रतिनिधी, दि.17
जालना- महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद जालना मार्फत सुरू असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्पांतर्गत 456 पदांची भरती करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रमाधिकारी श्रीमती कोमल कोरे -चाटे यांनी या संदर्भात प्रसिद्धी पत्र काढले आहे.जालना जिल्ह्यामध्ये एकूण बारा ठिकाणी ही पदे रिक्त आहेत .त्यामध्ये अंगणवाडी सेविकांची 114 तर अंगणवाडी मदतनीसांची 342 पदे भरल्या जाणार आहेत. दिनांक 24 फेब्रुवारी पर्यंत पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित पदासाठी पात्रता आणि अर्ज हे त्या -त्या तालुक्याच्या ठिकाणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध असल्याचेही श्रीमती कोमल कोरे यांनी सांगितले आहे.या रिक्त जागा खालीलप्रमाणे आहे