पोद्दार जम्बो किड्स व ट्विनकल स्टार इंग्रजी शाळेत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा.

बदनापूर/प्रतिनिधी, दि.29
जंगलाचा राजा म्हणून ओळख असलेल्या वाघ या प्राण्याचा दिवस निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित बदनापूर पोद्दार जम्बो किड्स व ट्विनकल स्टार इंग्रजी शाळेत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वाघाचे पोशाख परिधान करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने जागतिक वाघ दिवस साजरा केला.
असं म्हटलं जातंय की वाघ जगला तर जंगल जगेल आणि पर्यायाने निसर्गातील अन्न साखळी कायम राहिल. वन्यप्राण्यांच्या अन्नसाखळीतील वाघ हा सर्वात वरचा प्राणी, निसर्गातील की स्टोन प्रजातींपैकी एक. पण नैसर्गिक अधिवास नष्टता, अवैध शिकार, तस्करी, जंगलतोड आणि इतर कारणांमुळे वाघांची संख्या कमी झाली. त्यामुळे त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 29 जूलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातोय.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यध्यापिका निशिगंधा देशमुख यांनी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वाघाचे पोशाख परिधान करून कॅम्पस मधील गार्डन मध्ये मोठया उत्साहात व्याघ्र दिन साजरा केला.