उरण महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए.शामा यांनी कार्यक्रमात बोलताना विद्यार्थ्यांनी चुकीच्या सवयीचा त्याग करून आहार व आरोग्य यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासो काळेल यांनी एचआयव्ही एड्सची कारणे विद्यार्थ्यांसमोर विशद केली. व एचआयव्ही पासून बचाव कसा करावा याविषयीच्या उपाययोजना सांगितल्या.एचआयव्ही समुपदेशक महादेव पवार यांनी एचआयव्ही कायदा २०१७ व भेदभाव, उपचार याबद्दल मार्गदर्शन केले.एचआयव्ही समुपदेशक महादेव पवार व तृप्ती शिवाजी परजणे यांनी याप्रसंगी एकूण ४२ विद्यार्थ्यांचे एचआयव्ही चाचणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले तर आभार प्रा. विनिता तांडेल यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.