विकसित भारत संकल्प यात्राला भेट देण्याचे आवाहन ; विकसित भारत संकल्प यात्राला उत्स्फूर्त प्रतिसाद
केंद्र शासनाच्या वतीने आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा आज नूतन वसाहत व वाल्मिकी नगर येथे शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या स्टॉलचे आयोजन.

जालना/प्रतिनिधी,दि.15
केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रा आज नूतन वसाहत व वाल्मिकी नगर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, प्रशासन अधिकारी महेश शिंदे, शहर अभियंता सय्यद सौद मसूद, माजी नगरसेवक पिंटू भाऊ रत्नपारखे, अरुण दादा मगरे, केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगरचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार, मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
या अभियानात उपस्थितीत सर्वांनी एकत्रित आपला संकल्प विकसित भारताची शपथ घेतली. अभियानाच्या ठिकाणी भारत गॅसचे उज्वला योजना, आरोग्य विभागाचे सर्वांसाठी मोफत उपचार, आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, आयुषमान भारत, महानगर पालिकेचे हर घर जल, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी योजना, प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आधार कार्ड, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आदी स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलद्वारे वेगवेगळ्या शासनाच्या योजनाची नोंदणी, आधार अपडेट, आयुष्मान भारत कार्ड काढून देणे, सर्व रोग निदान शिबीर आदी करण्यात आले.
दि.16 जानेवारी 2024 पासून विकसित भारत संकल्प यात्रा क्रमवार मनपा शाळा, चंदनझिरा, शिवाजी शेंडगे हायस्कूल, सुंदर नगर, वनविभाग कार्यालय, मंगळ बाजार, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ढोरपुरा, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणीवेस, मारुती मंदिर, शंकर नगर, HWC, माळीपुरा, नगरपरिषद जुने कार्यालय किल्ला, मस्तगड, मारुती मंदिर, भवानी नगर येथे आयोजित करण्यात येणार आहे. ह्या अभियानाला भेट देऊन शासनाच्या विविध योजना जाणून घेण्याचे आवाहन महानगर पालिका मार्फत करण्यात आले आहे.