pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांच्यातर्फे होळीनिमित्त आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटप.

0 1 7 4 0 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25

स्वतः साठी तर सगळेच जगतात आयुष्यात दुसऱ्यांसाठी पण जगत राहावं ! आपल्या ताटातील भाकरीचा तुकडा एखाद्या भुकेल्या गरजूवंतांच्या मुखी घालून पहावं ! गरीब -श्रीमंत, उच्च -निच्चतेचे भेदभाव विसरून बंधूभावनेनं प्रेमाच्या रंगात न्हाऊंन निघण्याचा आणि माणुसकीच्या संस्कारातून रुजलेल्या गोड पोळीचा सण म्हणजे होळीचा सण आणि ह्याच अविट – गोड सणात आपल्या बाळ-गोपाळांसोबत आपला पण सण आनंदात साजरा व्हावा या विचारांच्यां विवंचनेत असणाऱ्या वाडी – वस्ती वरील आदिवासी बांधवांनां ह्या महागाईच्या काळात आपल्या संसाराचा गाडा चालवताना जीव मेटाकुटीला येत असतो. अश्यातच आदिवासी बांधवांनां आपण सण साजरे तरी कसे करायचे ? ह्या प्रश्नाचं काहूर त्यांच्या मनाला सतावतं असतो ! पण असं पण एक व्यक्तिमत्त्व आहे ! जे आदिवासी बांधवांकरिता सदैव आशेचा किरण बनून उभा असतो.त्यांची दिवाळी, त्यांची होळी आनंदात साजरी व्हावी ,गोड व्हावी या करीता दरवर्षी त्यांचे प्रत्येक सण उत्सव आनंदात साजरे करायला मदत करनारा,प्रत्येक संकट समयी मदतीचा हात पुढे करणारा,त्यांच्या मदतीला धावून जाणारा त्यांच्या जीवाचा मैतोर अर्थात महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी या हि वर्षी आपल्या मनाच्या मोठेपणाचं दर्शन घडवत रानसई येथील खोंड्याची वाडी,मार्गाची वाडी,भुर्याची वाडी,बंगल्याची वाडी, खैरकाठी,सागाची वाडी ,केळ्याचा माळ,वेश्वी आदिवासीं वाडी ह्या सर्व आदिवासी वाड्यांवरील बांधवांच्यां कुटुंबाची होळी आनंदीत व्हावी म्हणून त्यांना ह्या वर्षी तब्बल २५० ( अडीचशे किलो ),चणे – हरभरेे प्रत्येक वाडीवर तीस किलो,पंचवीस किलो या प्रमाणे वाटप केले.

प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा रंग भरणारा रंगोत्सव म्हणजेच शिमगोत्सव आणि याच उत्सवाला अनादी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा केअर ऑफ नेचर या सामाजिक संस्थेचे संस्थापक सदस्य राजू मुंबईकर यांनी रानसई येथील सर्व आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांनां होळीच्या सणा निमित्त प्रेमाची भेट देऊन त्यांना भरल्या मनाने शुभेच्छा देखील दिल्या.त्यांच्या सोबत ह्या आनंददायी रंगोत्सवाच्या क्षणी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक स्नेहल पालकर,केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे वेश्वी शाखा उपाध्यक्ष सुरेंद्रजी पाटील,आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत व केअर ऑफ नेचर संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.होळी सणाच्या निमित्ताने राजू मुंबईकर यांनी या आदिवासीं बांधवां करिता दिलेली ही प्रेमाची आणि आपुलकीची भेंट मिळाल्यावर त्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील ते आपुलकीचे निरागस आनंदी भाव पाहून खरचं होळी सणाचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला आणि होळीच्या भावनिक रंगात न्हाऊन गेला.असंच म्हणावे लागेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे