चव आणि परंपरा यांचा संगम असलेल्या स्वाद हॉटेलचे अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिच्या हस्ते उदघाटन
स्वाद हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी विविध मान्यवरांनी दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23
उरण तालुक्याचा झपाट्याने विकास होत असून येथील लोकांच्या विविध गरजाही मोठया प्रमाणात वाढल्या आहेत.त्यामुळे नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन चव आणि परंपरा यांचा संगम असलेल्या उत्तम गुणवत्तेचे पदार्थ नागरिकांना देण्याच्या दृष्टीने उरण मध्ये मोरा रोड उरण कोर्टाच्या बाजूला हॉटेल स्वादचे उदघाटन रविवार दिनांक २३/३/२०२५ रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिच्या हस्ते फीत कापून झाले .यावेळी भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका अध्यक्ष रवीशेठ भोईर, कामगार नेते जितेंद्र घरत, नगरसेवक राजू ठाकूर, आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश धुमाळ, भेंडखळ ग्रामपंचायत सदस्य अजित ठाकूर, आर्किटेक गौरी सानप आदी मान्यवर उपस्थित होते.या उदघाटन प्रसंगी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांनी स्वाद हॉटेलच्या रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, उत्तम नियोजनाचे कौतुक केले.व हॉटेल मधील विविध पदार्थाचा स्वाद घेतला. स्वाद हॉटेल हे उत्तम हॉटेल आहे. येथे उत्तम नियोजन आहे. चांगली व्यवस्था आहे. नागरिकांसाठी व्हेज व नॉन व्हेज असे दोन्ही प्रकारचे उत्तम गुणवतापूर्ण असे चांगले पदार्थ आहेत. येथील जेवणाचा, विविध पदार्थाचा उत्तम स्वाद आहे.हॉटेलच्या नावातच स्वाद आहे. त्यामुळे निश्चितच हे हॉटेल मोठया प्रमाणात नावारूपास येईल, प्रसिद्ध होईल. उरण मधील व इतर भागातील नागरीकांनी स्वाद हॉटेल मधील विविध अन्न पदार्थाचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा.असे आवाहन अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिने यावेळी केले.भाजप नेते तथा कामगार नेते जितेंद्र घरत यांनीही विविध पदार्थचा आस्वाद घेतला व स्वाद हॉटेलच्या मॅनेजमेंटचे कौतुक केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हॉटेलच्या मॅनेजमेंट टीमने विशेष मेहनत घेत सर्वांचे आदरतिथ्य करून कार्यक्रम यशस्वी केले. व्हेज व नॉन व्हेज असे दोन्ही प्रकारात सर्वच पदार्थ हॉटेल मध्ये उपलब्ध असल्याने, नवीन हॉटेल उघडल्याने ग्राहकांनी, जनतेने सुद्धा यावेळी विविध पदार्थ, जेवणाचा आनंद घेत समाधान व्यक्त केले आहे. उदघाटन असल्याने यावेळी सर्वांना जेवण फ्री होते. या बद्दल उपस्थित नागरिकांनी आभार व्यक्त केले.या हॉटेल मध्ये थाळी हा प्रकार स्पेशल आहे. पापलेट थाळी, सुरमई थाळी, मटण थाळी, चिकन थाळी असे प्रकार स्पेशल आहेत. याशिवाय चायनीस, पंजाबी, ब्रेकफास्ट आदी विविध स्पेशल व्हरायटी पण आहेत.त्यामुळे उरण करांना एकाच छताखाली सर्व गोष्टी, पदार्थ उपलब्ध होणार आहेत.उरण मधील नागरिकांना आता उत्तम क्वालिटीचे पदार्थांचा आस्वाद घेता येणार असल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.