pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु; पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करावेत

0 1 2 1 1 2

जालना/प्रतिनिधी,दि.18

नॉन ट्रान्सपोर्ट चारचाकी मोटार जीप, कार वाहनांची नोंदणी मालिका एमएच 21 बी व्ही- ही मालिका सद्यस्थितीत सुरु असून या मालिकेतील क्रमांकाचे वाटप पुर्ण होत आहे. तरी नॉन ट्रान्सपोर्ट चार चाकी मोटार जीप, कार वाहनांसाठी एमएच- 21 सी ए- 0001 ते 9999 ही मालिका गुरुवार दि. 19 ऑक्टोबर 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. तरी ज्या वाहन धारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा असेल त्यांनी आपला विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह शुक्रवार दि.20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांच्याकडे सादर करावेत.
अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा मुळ किमतीचा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांच्या नावे असलेला डिमांड ड्राफ्ट, ओळखपत्र छायांकित प्रत, पॅनकार्ड व दुरध्वनी क्रमांकासह कार्यालयात जमा करावेत. नवीन मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप ‘महाराष्ट्र मोटार वाहन नियम’ व परिवहन आयुक्तांचे परिपत्रकानुसार करण्यात येईल. तसेच एकाच आकर्षक क्रमांकासाठी अनेक अर्जदारांनी अर्ज केल्यास त्यासाठी विहीत पध्दतीने लिलावाची प्रक्रीया अवलंबिण्यात येईल. एका क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज आलेले असतील तर एका क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त आलेल्या अर्जदारांनी वाढीव रक्कमेचा एक धनाकर्ष आणणे आवश्यक आहे. पहिला धनाकर्ष मुळ किंमतीचा व दुसरा धनाकर्ष आपण लावलेल्या बोलीच्या वाढीच्या रकमेचा असावा. धनाकर्ष विहीत शुल्कापेक्षा सर्वात जास्त रक्कमेचे ज्यांचे असतील त्यांनाच हा क्रमांक आरक्षित करुन दिला जाईल. सर्व संबंधितांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांचे नावावर आपले धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करावेत. वेळेनंतर कोणत्याही सबबीवर धनाकर्ष जमा करुन घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच दुपारी 2 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येणार असून संबंधितांनी वेळेवर उपस्थित रहावे, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2