महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा-2024; जिल्ह्यातील परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
जालना/प्रतिनिधी,दि.4
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि.21 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा-2024 आयोजित करण्यात आली आहे. तरी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी जारी केले आहेत.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षेसाठी जालना जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार असून जिल्ह्यात मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनियरींग ॲन्ड टैक्नोलॉजी, अंकुशराव टोपे कॉलेज, सीएमटीके गुजराती शाळा, आरजी बागडिया कला व एसबी लखोटीया वाणिज्य आणि आर बेंझोंजी सायन्स महाविद्यालय तसेच सरस्वती भुवन प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा टॉऊन हॉल या उपकेंद्रावर परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नूसार आदेश काढण्यात आला आहे. आदेश दि.21 जुलै 2024 रोजी सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.