pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पेंशन फॉर वोट, शिक्षकाची वेठबिगारी थांबवा या आणि मागण्यासाठी जि. प.समोर आंदोलन

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी, दि.22

 

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पडत्या पावसात शिक्षक, शिक्षिकांनी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला होता.

अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी  पेन्शन योजना लागू करावी, निकषपात्र विनाअनुदानित शाळा, वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान देण्यात यावे यासह खालील मागण्या करण्यात आल्या आहे.

१) अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे २)राज्यातील निकष पात्र विनाअनुदानित शाळा ,वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सूत्रानुसार अनुदान देऊन
शिक्षकांची वेठबिगारी संपवावी
३)राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०,२०,३० अशा तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी
४)सेवानिवृत्त शिक्षकांना नेमणूक देण्या ऐवजी सुशिक्षित बेरोजगारांना संधी देऊन डीएड व बीएड प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करावी
५)इंग्रजी माध्यमाच्या सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देण्यात याव्यात व सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सर्व लाभ मिळावे
६)तासिका तत्वावर ७)अल्प मानधनावर काम करीत असलेल्या प्राध्यापकांना नियमित प्राध्यापक म्हणून मान्यता देण्यात याव्यात
८)सर्व शैक्षणिक संस्थांचे वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे
९)राज्यातील शिक्षकांची सुमारे 65 हजार रिक्त पदे तात्काळ भरावी
१०)शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात या व इतर 24 मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगला धुपे गायकवाड यांना केंद्रीय कार्यकारिणी चे उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटटे ,जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे ,सचिव संजय येळवंते,केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रेमदास राठोड , आरेफ कुरेशी,मार्गदर्शक प्रा डॉ मारुती तेगमपुरे, प्रा डॉ पुरुषोत्तम जुन्ने,जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे ,जगन वाघमोडे , सहसचिव गणेश चव्हाण ,दीपक शेरे यांनी दिले .भर पावसात अर्थतज्ञ प्रा.डॉ मारुती तेगमपुरे ,जुन्या पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर गाडेकर ,स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष ज्ञानेश पाटील चव्हाण , शिक्षक समन्वय समितीचे सुराशे सर, १०० शिक्षक क्लब चे राज्याध्यक्ष राजेभाऊ मगर  यांनी उपस्थित शिक्षक बंधू भगिनींना मार्गदर्शन केले .यावेळी विशेष करून इंग्रजी माध्यम शाळा शहराध्यक्ष सोहम बोदवडे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचार आणि समस्या विषयी मत व्यक्त केले .शिक्षकांची वेठबिगारी थांबलीच पाहिजे ! जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे ! १०० टक्के अनुदान मिळालेच पाहिजे ! अनुदान आमच्या हक्काचं !नाही कुणाच्या बापाचं !एकच मिशन- जुनी पेन्शन !!इन्कलाब जिंदाबाद !!या व इतर अनेक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.जिल्हाभरातून बहुसंख्य प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,इंग्रजी माध्यमातील शाळांतील कर्मचारी ,महिला कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक संजय येळवंते ,सूत्रसंचालन कोषाध्यक्ष नारायण मुंडे यांनी व आभार प्रदर्शन प्रेमदास राठोड यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2