pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लासूरला आ. प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत जय श्रीरामच्या जयघोषात निघाली शोभायात्रा…..

अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलशाची आ. प्रशांत बंब, विश्व् हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री सचिन रहाणे व तेरा करसेवकांच्या हस्ते पूजन व भव्य मिरवणूक संपन्न ..

0 1 7 4 0 8

छ. संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.31

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील गणपती मंदिरात अयोध्या येथून अक्षदा कलश आलेला असून रविवारी सकाळी आठ वाजता आ. प्रशांत बंब, विश्व् हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री सचिन रहाणे धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे जिल्हाप्रमुख हभप कडुबाळ महाराज गवांदे व राममंदिरासाठी तुरंगवास भोगलेल्या तेरा कारसेवकांच्या शुभहस्ते या अक्षदा कलशाचे पूजन संस्थान गणपती मंदिरात पार पडले व सकाळी नऊ वाजता प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते सजवलेल्या रथात ठेऊन भव्य मिरवणूक शहरातून जय श्रीरामच्या जयघोशात संपन्न झाली.
दरम्यान 22 जानेवारीला अयोध्या येथील राममंदिराचे न भूतो न भविष्यती असा लोकार्पण सोहळा होणार असून याची देहा याची डोळा आपल्याला हा सोहळा पाहायला मिळावा म्हणुन एक जानेवारी ते बावीस जानेवारीपर्यंत देशातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक गाव अनं गाव व प्रत्येक घरापर्यंत अयोध्या येथून आलेल्या अक्षदा व श्रीराम यांच्या फोटो पोहचवावा व राममंदिर लोकार्पणचे निमंत्रण अक्षदा देऊन द्यावे असे आवाहन सचिन रहाणे यांनी केले
दरम्यान मिरवणूक मार्गात श्रीकृष्ण मंदिर, डोणगाव रोडवरील हनुमान मंदिर येथे आ. प्रशांत बंब व सचिन रहाणे, कडुबाळ गवांदे महाराज, भाजपयुमोचे जिल्हाद्यक्ष अमोल पाटील जाधव यांनी दर्शन घेऊन पूजन केले व शोभयात्रेची सांगता श्री स्वामी समर्थ केंद्रात कलशपूजन व आरती होऊन झाली यावेळी सरपंच मीनाताई संजय पांडव,ग्रामपंचायत सदस्य, बाजार समिती संचालक, ऍड. वाय. एन. जाधव,श्रीकांत नवपुते,विशाल मुंदडा, बाबासाहेब सोमासे, संतोष पाटील साखळे,राजेश चव्हाण,सचिन तांबे,किशोर अप्पा चव्हाण,ऋषिकेश जाधव,बाळासाहेब कदम, आदिसह गणपती मंदिराचे ब्रह्मवृंद, ग्रामउपाध्ये,वारकरी विद्यार्थी, स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी, बालाजी आरती मंडळ,महिला पुरुष रामभक्त,आदीची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे