उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तिवर प्रभु श्रीराम मंदीराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सोमवार दि. 22 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहिर करावी अशी मागणी भाजपा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख बाबासाहेब कोलते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात श्री कोलते यांनी म्हटले आहे की, अयोध्येमध्ये सोमवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी प्रभु श्री रामाचे मंदिराचे भव्य दिव्य उद्घाटन भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हस्ते होत आहे. त्या दिवशी उत्तर प्रदेश सरकारने राज्यामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य सरकारने सुध्दा सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. महाराष्ट्र राज्यातील प्रभु श्री रामाच्या मंदिराच्या उद्घाटनामुळे उत्सवी वातावरण लक्षात घेता त्या दिवशी सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या संख्येने मिरवणूका निघतील त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा व अडचण निर्माण होवू शकेल, नोकरी व्यवसायासाठी बाहेर पडणा-याआणि शालेय विद्यार्थ्यांना यांचा फटका बसु नये व शालेय विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांनाही या आनंदात सहभागी होता याव यासाठी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली तर सर्वच नागरीकांना या उत्साहात सहभागी होण शक्य होईल तसेच सार्वजनिक रस्त्यावर होणाऱ्या उत्सवामुळे कोणालाही वाहतुकीची अडचण होणार नाही सार्वजनिक शासकीय सुट्टी असेल तर वाहतुकीच्या खोळंब्याचा त्रास कामावर जाणाऱ्या किंवा शाळा महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार नाही. तसेच कामावर जाणाऱ्या लोकांनाही या उत्साहात सहभागी होता येईल. हि बाब लक्षात घेवून सोमवार दि. 22 जानेवारी 2024 हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहीला जाणारा ऐतीहासीक दिवस या दिवशी महाराष्ट्र राज्य सरकारने सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी असे देखील या निवेदनात शेवटी म्हटले आहे.
बाबासाहेब पाटील कोलते
भाजपा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख
मो. 9860707500