pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रतिभा माध्यमिक विद्यालय, काजळा येथे भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी!

0 1 1 8 1 8

काजळा/प्रतिनिधी, दि.5

बदनापूर तालुक्यातील प्रतिभा माध्यमिक विद्यालय येथे भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला शाळेची विद्यार्थ्यांनी कु.विद्या मोंढे वर्ग 10 वा हिने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री गुजर हे होते यावेळी विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने आपली मनोगते व्यक्त केली तसेच शिक्षकांविषयी भावना व्यक्त केल्या.
यावेळी शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन हा स्वयंशासन दिन म्हणून साजरा केला आहे,यामध्ये विद्यार्थी मुख्याध्यापक, विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थी शिपाई, विद्यार्थी लिपिक अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या यामध्ये सानिया सय्यद,वर्ग 10 वा हिने मुख्याध्यापक,राणी भोसले,वर्ग 10 वा हिने लिपिकाची,वैष्णवी इंदलकर,वर्ग 9 वा हिने उप मुख्याध्यापक, तर शिपाई म्हणून ,ध्रुव पडूळ,विशाल भोर्डे, गणेश भोसले, यांनी कार्यालयीन कामकाजाविषयी चोख भूमिकापार पाडल्या, तर शिक्षक म्हणून कु.दर्शना गरड,कु.रुद्राक्षी भोर्डे,कु.साक्षी वाल्हुरे,
कु.संजीवनी सावंत,दिपक पैठणे, विशाल गरड,वर्ग 10 वा,कु.आरती वाघचौरे,कु.कार्तीकी मदनुरे,कु.वैष्णवी मदनुरे,कु.गायत्री शिंदे,कु.गायत्री पैठणे,
कु.श्रावणी कोळेकर, रामेश्वर मांगडे, आदित्य जाधव,आदित्य जगदाळे,कार्तिक शेवलीकर वर्ग 8 वा,अर्शद सय्यद,सार्थक करडे,आतिक शेख, सुमित बोबडे,चैतन्य भोसले,ओमकार जाधव वर्ग 7 वा, कु.श्रुती मांगडे,वर्ग 6 वा,कु. ललिता खोटे,शोयब सय्यद,सोमीनाथ कुटे,वर्ग 5 वा या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका विषय निवडून पार पाडल्या, अशा प्रकारे प्रतिभा माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती “शिक्षक दिन” म्हणून तर शिक्षक दिन “स्वयंशासन दिन” म्हणून पाळण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

4.7/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 8