विशेष महिला फार्मासिस्ट रिफ्रेशर्स कोर्सचे यशस्वीरित्या आयोजन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10
सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महिल्या फार्मासिस्टच्या सक्षमीकरणासाठी केमिस्ट असोसिएशन उलवे व महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल(MSPC )यांच्या मार्फत विशेष महिला फार्मासिस्ट रिफ्रेशर्स कोर्सचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.जवळपास १०० महिला फार्मासिस्ट यांचा उस्फुर्त प्रतिसाद सहभाग होता.
PCI / MSPC चे कार्यकारिणी सदस्य आप्पासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल (MSPC) चे अध्यक्ष अतुलजी अहीरे यांच्या नेतृत्वाखाली या कोर्स चे आयोजन करण्यात आले होते.”जिजाऊ आणि सावित्री प्रमाणे राष्ट्र नवनिर्माणाचे सामर्थ्य घडण्याचे बळ आजच्या आपल्या फार्मासिस्ट भगिनीमध्ये यावे” त्यासाठी आप्पासाहेब शिंदे हे नेहमीच प्रोत्साहन व मार्गदर्शन करत असल्याचे सीमा सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले.महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष अतुलजी अहीरे यांनी महिला फार्मासिस्ट च्या सक्षमीकरणासाठी शिक्षणासाठी महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल सदैव तत्पर राहील अशी ग्वाही दिली.यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त डॉ. डी. सी. शेख,महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल चे सदस्य नितिन मनियार, रजिस्ट्रार सायली मसाळ, मुंबई झोनचे सेक्रेटरी सुनिल छाजेद, रायगड जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे अध्यक्ष लीलाधर पाटिल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी औषध निरीक्षक भाग्यश्री कदम, मंजिरी घरत, विनिता खानविलकर , निर्मल कासेकर व डीआयसीचे टेकनिकल इंचार्ज डॉ. विनया कुलकर्णी यांनी फार्मासिस्टला मार्गदर्शन केले.या कोर्स साठी रायगड जिल्ह्यातील विविध भागातील महिला फार्मासिस्ट मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केमिस्ट असोसिएशन उलवे आणि रायगड जिल्हा व पनवेल तालुका केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.