pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

“जीवनरंग आरोग्य तपासणी शिबिर”

0 4 0 7 6 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.10

बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती, मुंबई आणि जालना शाखेच्या वतीने जीवनरंग आरोग्य तपासणी शिबिर 10 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा शासकीय रुग्णालय , जालना येथे घेण्यात आले.

बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई च्या अध्यक्षा *ॲड. निलमताई शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून सभासद आरोग्य तपासणी शिबिर संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 27 जिल्ह्यांमध्ये बालरंगभूमी परिषदेच्या वतीने राबविण्यात येते. त्याचप्रमाणे आज तुम्ही बालरंगभूमी परीषद शाखा जालन्याच्या सर्व पदाधिकारी व सभासदांसाठी आरोग्य शिबिर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील ,अति जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र गाढेकर,स्रीरोग तज्ञ डॉ. प्रज्ञा कुलकर्णी ,डॉ. स्वप्नाली परमेश्वर, डॉ.स्मिता पंडित यांच्या मार्गदर्शनात सर्व सभासदांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराप्रसंगी बाल रंगभूमी परिषद शाखा जालना अध्यक्षा वैशाली शालिग्राम दाभाडे,कार्याध्यक्ष डॉ.अमजद सय्यद,कोषाध्यक्ष राजेश राऊत कार्यकारणी सदस्य विशाल दाभाडे,राणी परदेशी (ठाकूर ),पुष्पलता दाभाडे,सुमित्रा दांडगे, आदी सभासद उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 6 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे